वर्धा : सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर आता पुढील टप्पा म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसाठी या परीक्षेतील गुण महत्त्वाचे ठरतात. त्यानुसार सीईटी सेलकडून बावीस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – वर्धा : ‘कबड्डी’, ‘पंगा’ला मोठी मागणी; काळा बाजारही जोमात

एमबीए, एमसीए, विधी हे पाच वर्षीय अभ्यासक्रम, कृषी, अभियांत्रिकी, फार्मसी यासाठी १५ जूनपासून नोंदणी करता येणार आहे. तर हॉटेल मनेजमेंट, नियोजन, बी.टेक, फाईन आर्टस व अन्य अभ्यासक्रमांची नोंदणी १६ जूनपासून सुरू होईल. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया पद्धतीने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.

Story img Loader