केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>संत्रा उत्पादन वाढीसाठी ‘आयआयएम’ नागपूरचा पुढाकार; राज्यातील ३० हजार उत्पादकांना देणार प्रशिक्षण

response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Navi Mumbai Airport will be operational in three months training classes for affected youth start soon
विमानतळबाधित तरुणांना प्रशिक्षण, सिडको मंडळ आणि अदानी कंपनीच्या समन्वयातून कौशल्यवर्ग
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
upsc training center loksatta news
जिल्हास्तरावर यूपीएससी, एमपीएससीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार? सुधारणा समितीसमोर…
Success Story : इच्छाशक्ती! कोट्यावधीची नोकरी सोडून निवडले आयएएस पद; वाचा देशात पहिला येणाऱ्या कनिष्क कटारियाची गोष्ट
birth certificate Rohingya Bangladeshi Tehsildar, Naib Tehsildar Malegaon
रोहिंगे, बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा ठपका; मालेगावचे तहसीलदार,नायब तहसीलदार निलंबित

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (एसआयएसी), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>राज्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर मिळणार कधी?; कोटय़वधींच्या इमारती केवळ शोभेच्या वास्तू

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा ४ डिसेंबरला (ऑफलाईन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना http://www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. लाखे यांनी केले आहे.

Story img Loader