अकोला: ‘निवडणुका जवळ आल्यावर भाजप-संघाचे गुंड समाजात जातीय द्वेष, जातीयवाद आणि असत्यतेला खतपाणी घालतात,’ असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोल्यातील एका मुस्लिम व्यक्तीच्या हॉटेलमध्ये दलित, आदिवासी व ओबीसी सहकाऱ्यांसह ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मांसाहारी जेवनाचा आस्वाद घेतला. ही वैविध्यपूर्णता देशाची ताकद असल्याचे त्यांनी म्हटले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करीत जातीयवादावरून भाजप आणि संघाला लक्ष्य केले. देशात भीतीचे वातावरण पसरवले जात आहे. मणिपूरची परिस्थिती चिघळली असून सरकारला त्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. निवडणुका जवळ आल्या की भाजप-संघाचे गुंड समाजात जातीय द्वेष, जातीयवाद आणि असत्यतेला खतपाणी घालतात.
हेही वाचा… विजय वडेट्टीवार यांची आढावा बैठक रंगात असतानाच सुनील केदार अचानक संतापले, नेमके झाले तरी काय? वाचा
मी अकोल्यातील एका मुस्लिम मालकाच्या हॉटेलमध्ये तंदूरी चिकन, फिश फ्राय आणि आवडत्या मटण बिर्याणीचा वेगवेगळ्या समाजातील सहकाऱ्यांसोबत आस्वाद घेतला. दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम आपल्याला अद्वितीय, वैविध्यपूर्ण, अनेकवचनी ओळख पटवून देतात. ती नेहमीच आपल्या देशाची ताकद आहे. हा मी आहे. हे आम्ही आहोत. ही वंचित बहुजन आघाडी आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे.