लोकसत्‍ता टीम

अमरावती : खासदार किंवा आमदार दिवंगत झाल्‍यानंतर सहा महिन्‍याच्‍या आत त्‍या ठिकाणी पोटनिवडणूक घेणे कायद्याने बंधनकारक असताना निवडणूक आयोग त्‍या टाळून संवैधानिक चौकट मोडायला निघाले आहे. जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर राजीनामा द्या आणि मोकळे व्‍हा किंवा तत्‍काळ पोटनिवडणुका घ्‍या, असे आपले निवडणूक आयोगाला आवाहन आहे. या दोन गोष्‍टी झाल्‍या नाहीत, तर ज्‍या-ज्‍या ठिकाणी निवडणूक आयोग जाणार आहे, त्‍या ठिकाणी जनतेने निदर्शने केले पाहिजेत, मोर्चे काढले पाहिजेत आणि तेही करून ऐकत नसतील, तर निवडणूक आयोगाला मारझोड सुद्धा केली पाहिजे, असे वक्‍तव्‍य वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
Pune Municipal Corporation news in marathi
नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे बंधारे पालिका का काढणार, हे आहे कारण !

प्रकाश आंबेडकर म्‍हणाले, निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्‍याचा अधिकार नाही. निवडणूक आयोग स्‍वायत्‍त आहे. उच्‍च न्‍यायालयाने निवडणूक घेण्‍याचे आदेश देऊनही त्‍याचे पालन केले जात नाही. निवडणूक आयोगाचा कारभार हा सरकारच्‍या इशाऱ्यावर सुरू आहे. निवडणूक आयोग जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल, तर त्‍यावर जाब विचारण्‍याचा अधिकार हा जनतेला आहे. कारण जनता ही या देशाची मालक आहे. निवडणूक आयोग ऐकत नसेल, तर मारझोड सुद्धा केली पाहिजे. मारझोड करणे म्‍हणजे कायदा हातात घेणे नव्‍हे. कायद्याची अंमलबजावणी करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. ते काम जर प्रामाणिकपणे करणार नसतील आणि त्‍या विरोधात जर जनतेने उठाव केला, तर त्‍यासाठी निवडणूक आयोगच जबाबदार राहील.

आणखी वाचा-Video : पठाणी पेहराव, गळ्यात मफलर आणि हातात धारदार तलवार… आमदार इंद्रनील नाईक सपत्नीक थिरकले

निवडणूक‍ आयोगाने दिवंगत झालेल्‍या लोकप्रतिनिधीच्‍या मतदार संघांमध्‍ये ताबडतोब निवडणुका घेतल्‍या पाहिजेत. लोकांचा संताप वाढला तर लोक आवाज उठवतील आणि त्यावेळी तुम्‍हाला वाचविण्‍यासाठी आज तुम्‍ही ज्‍यांना वाचवत आहात, तेही येणार नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर म्‍हणाले, निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणे कारभार केला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. या विषयी राजकीय पक्ष देखील भूमिका घ्‍यायला भितात, त्‍यामुळे निवडणूक आयोगाचे फावले आहे. निवडणुकीत जय-पराजय होत रा‍हतो, पण संविधानाने जी व्‍यवस्‍था निर्माण केली आहे, ही टिकवण्‍याची जबाबदारी राजकीय पक्षाची आणि त्‍याहून अधिक निवडणूक आयोगाची आहे, असे आंबेडकर म्‍हणाले.

Story img Loader