नागपूर : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांच्या भरतीसाठी महराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सात जिल्हाकेंद्रांवर यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. पीएसआय पदासाठी विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर पीएसआयची पूर्व परीक्षा ही २ डिसेंबरला होणार आहे. अनेक वर्षांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ६१५ जागांची जाहिरात आल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पदभरतीसाठी विद्यार्थी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. पीएसआय पदासाठी अमागास उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० राहणार आहे. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणीनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. ६१५ पदांसाठीची ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना येथे भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे.

Story img Loader