चंद्रपूर: पेसा क्षेत्रात वर्ग ३ व ४ ची १७ संवर्गातील पदे भरताना १०० टक्के अनुसूचित जमातीच्या उमेदवारातूनच भरण्याच्या ९ जून २०१४ च्या राज्यपालाच्या अधिसूचनेत २९ ऑगस्ट २०१९ ला राज्यपालाचे अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यात आली. ती अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यात अंमलात आली आहे. मात्र, राज्य शासनाने तलाठी पदाची जाहिरात काढतांना राज्यपालांच्या जुन्याच अधिसूचनेनुसार जाहिरात प्रकाशित केल्याने ओबीसी सह एससी, एनटी, व्हीजे, एसबीसी, इडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना या पदभरतीत एकही स्थान मिळाले नसल्याने या प्रवर्गातील उमेदवारांवर फार मोठा अन्याय झाला आहे.

गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, अमरावती, यवतमाळ, पुणे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, धुळे, नांदेड, जळगाव, व अहमदनगर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील तलाठी व वनरक्षक पदभरती मध्ये ओबीसीवर अन्याय झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तलाठ्यांची ४६४४ पदे भरण्याची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने विभागाने नुकतीच प्रकाशित केली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात १५८ पदांपैकी पेसा क्षेत्रातून १५१ पदे, चंद्रपूर १६७ पैकी १६, पालघर१४२ पदापैकी १०९ पदे, अमरावती जिल्हातून ५६ पदापैकी २६ , यवतमाळ १२३ पदापैकी ३६, पुणे जिल्ह्यातून ३५८ पदापैकी १२, नंदूरबार ५४ पैकी ५२, नाशिक जिल्ह्यातून २६८ पदापैकी ९६, ठाणे जिल्ह्यातून ६५ पदापैकी १९, धुळे २०५ पैकी ४९, नांदेड ११९ पैकी ११, जळगाव २०८ पैकी १०, अहमदनगर २५० पदापैकी १३ पदे पेसा क्षेत्रातून भरण्यात येणार आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Citizens in rural areas will get property certificate thane news
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “

हेही वाचा >>>बुलढाणा: ‘समृद्धी’वरील ट्रॅव्हल्सच्या अपघाताचा तपास ‘एसडीपीओं’ कडे; प्रतिबंधासाठी पाच पोलीस ठाण्यांची समिती गठित

पेसा क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे असून आवश्यक शैक्षणिक अहर्ता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येईल असे स्पष्ट निर्देश उमेदवारांना देण्यात आले आहे.२८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील ज्या गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५ ते ५० टक्के पर्यंत आहे. अशा गावातील १७ संवर्गीय पदे भरताना ५० टक्के अनुसूचित जमातीतून, ६ टक्के अनुसूचित जातीतून, ९ टक्के इतर मागास प्रवर्गातून ६ टक्के विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून, ५ टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून तर २४ टक्के खुल्या प्रवर्गातील भरण्याचे निर्देश आहेत. तर ज्या गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५ टक्के पेक्षा कमी आहे अशा गावातील १७ संवर्ग पदे भरताना २५ टक्के अनुसूचित जमातीतून, १० टक्के अनुसूचित जातीतून, १४ टक्के इतर मागास प्रवर्गातून, १० टक्के रड विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून, ७ टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून तर ३४ टक्के खुल्या प्रवर्गातून भरण्याची निर्देश आहे.

हेही वाचा >>>यवतमाळ: ‘समृद्धी’वरून प्रवास नको रे बाबा! काही ट्रॅव्हल्स पुन्हा जुन्या मार्गावर धावू लागल्या…

असे असताना, ९ जून २१४ च्या जुन्या अधिसूचनेनुसार जाहिरात काढण्याचे कारण काय? असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. ही चूक शासनाच्या लक्षात आणून देत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रकाशित करण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ इतर समविचारी संघटना व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, गणेश आवारी, रवींद्र टोगे, दीपक पिपलशेंडे, वैभव सिरसागर, उदय टोगे, प्रशांत पिपलशेडे, राहुल चालुलकर, विशाल धाबेकर, सुमित देवालकर उपस्थित होते.

Story img Loader