नागपूर : नागपूरमध्ये टेकडी गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. दररोज येथे शेकडो भक्त दर्शनासाठी येतात. चतुर्थीला भक्तांची संख्या दुपटीने वाढते. तीळ चतुर्थीला मंदिरात तर यात्रा भरते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेलाही मंदिर भक्तांनी फुलले असते. आता मंदिर व्यवस्थापनाने भक्तांना मंदिरात येताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याचे कारण आहे मंदिरासमोरील जाणारा उड्डाण पूल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – लोकजागर : कुलीनांचे ‘कलंकप्रेम’!

काय आहे सूचना?

टेकडी गणेश मंदिराच्या भक्तांना सूचित करण्यात येत आहे की, मंदिरासमोरील उड्डाणपूल तोडण्याचे कार्य महामेट्रो कार्पोरेशनद्वारे जुलै महिन्याच्या मध्यावधीपासून सुरू करण्यात येईल. अशी सूचना प्राप्त झाली आहे. तरी सर्व दर्शन करणाऱ्या भक्तांनी येताना स्वत:ची काळजी स्वतः घ्यावी. कृपया भक्तांनी सहकार्य करावे, असे टेकडी गणेश मंदिर संस्थानचे सचिव श्रीराम बी. कुळकर्णी यांनी सांगितले आहे.