नागपूर : दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘गामिनी’ या मादी चित्त्याने मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच बछड्यांना जन्म दिल्याची बातमी गेल्या आठवड्यात समोर आली. मात्र, ‘गामिनी’ने पाच नाही तर सहा चित्त्यांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी हे स्पष्ट केले. त्यामुळे सहा बछड्यांना जन्म हा विश्वविक्रमच मानावा का, अशी स्थिती आहे.

हेही वाचा >>> विदर्भात काँग्रेसचे सामाजिक अभिसरणाकडे दुर्लक्ष होते आहे का ?

Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
tigress who is worried about her cub disappearing is got panic
चवताळलेल्या वाघीणीच्या डरकाळ्या सुरू, सुरक्षा म्हणून रस्त्याला बॅरिकेट्स…
Himalayan vulture loksatta news
Himalayan Vulture : उरणमध्ये हिमालयीन गिधाडाला जीवदान
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…

दहा मार्चला भूपेंद्र यादव यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच वर्षीय ‘गामिनी’ या मादी चित्त्याने पाच बछड्यांना जन्म दिल्याची माहिती ‘एक्स’ या समाजमाध्यमावरुन सामाईक केली. सोमवारी त्यांनी पुन्हा याच समाजमाध्यमावरुन या बछड्यांबाबत आणखी नवीन माहिती दिली. भारतातील चित्त्यांच्या जन्माने आनंदित झालेल्या यादव यांनी ‘गामिनी’ या मादी चित्त्याने पाच नाही तर सहा बछड्यांना जन्म दिल्याचे सांगितले. तिच्या आई होण्याचा हा विक्रमच मानावा का, असे सांगताना त्यांनी या सहा बछड्यांचे काही व्हिडिओदेखील सामाईक केले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची संख्या आता २७ झाली असून, त्यात १४ बछड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> बाळासाहेबांच्या सेनेला ‘बाळासाहेबांची’ धास्ती! भूमिकेकडे आघाडीचे लक्ष

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मादी चित्ता ‘ज्वाला’ (नामिबियाचे नाव सियाया) हिने चार शावकांना जन्म दिला होता, पण त्यातील केवळ एकच जिवंत राहू शकला. या वर्षी जानेवारीमध्ये ‘ज्वाला’ने दुसऱ्यांदा चार बछड्यांना जन्म दिला, त्यानंतर चित्ता ‘आशा’ने तीन शावकांना जन्म दिला. चित्ता प्रकल्पाअंतर्गत भारतात १७ सप्टेंबर २०२२ ला मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच मादी आणि तीन नर  असे आठ चित्ते नामिबिया येथून आणण्यात आले. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये, दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते उद्यानात आणण्यात आले. ‘गामिनी’ ही दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या गटाचा एक भाग आहे. गेल्या वर्षी मार्चपासून ‘ज्वाला’ने जन्म दिलेल्या तीन बछड्यांसह दहा चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

Story img Loader