नागपूर : भाजपा नेत्या सना खान यांचा मृतदेह तब्बल १४ दिवसांनंतर बुधवारी पोलिसांच्या हाती लागला. तो घेण्यासाठी नागपूर आणि जबलपूर पोलीस पथकासह सना यांचे नातेवाईक सिहोर गावाकडे रवाना झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सना खान यांचा कथित प्रियकर जबलपूरमधील कुख्यात गुंड अमित शाहू याने २ ऑगस्टला खून केला होता. मृतदेह कटंगीजवळील पुलावरून हिरन नदीत फेकला होता. हिरन नदीचा ३ किलोमीटरनंतर नर्मदा नदीशी संगम आहे. त्यामुळे सना यांचा मृतदेह खूप दूरपर्यंत वाहून गेल्याची शक्यता होती. नागपूर आणि जबलपूर पोलीस सना यांच्या मृतदेहाचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी घटनास्थळाच्या जवळपास ३०० किमी अंतरावर सिहोर गावाजवळील नर्मदा नदीच्या काठावर सना यांचा मृतदेह मिळाला.

हेही वाचा – बडनेरात आहे १३५ वर्षे जुनी पारशी अग्‍यारी! जाणून घ्‍या महत्‍व….

हेही वाचा – बक्कळ उत्पन्न देणारी कार्नेशन फुलाची शेती

नागपूर पोलिसांचे एक पथक आणि सना खान यांचे नातेवाईक लगेच सिहोर गावाकडे रवाना झाले आहेत. मृतदेह सना खानचाच आहे किंवा अन्य कुण्या महिलेचा आहे, याबाबत पोलीस खात्री करून घेणार आहे. मात्र, नदीच्या काठावर मिळालेल्या मृतदेहाचे वर्णन सना खाना यांच्याशी जुळत असल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 14 days the dead body of bjp leader sana khan was finally found adk 83 ssb
Show comments