लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाशीम: सागर नावाने शहरात परिचित असलेला युवक विविध सामाजिक राजकीय कार्यक्रमात सहभागी असायचा, त्यामुळे त्याची धडपड्या मुलगा म्हणून ओळख होती. मात्र, गेली अनेक वर्षे त्याने स्त्री असल्याचे रहस्य मनात दाबून टाकले. परंतु सत्य किती दिवस झाकले जाणार म्हणून त्याने धाडस केले आणि तब्बल ३८ वर्षानंतर आपण पुरूष नसून एक स्त्री असल्याचे खुल्या मनाने जाहीर केले. यासाठी येथील तिरुपति लॉन येथे तेरा तुझको अर्पण अभिनंदन समारोह संपन्न झाला.
सर्वांना परिचित असलेले सागर चुंबळकर हे नेहमीच धार्मिक तसेच समाज कार्यात अग्रेसर. वयाच्या ८ व्या वर्षा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जात होते व त्या नंतर त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची सुरवात केली. त्यानंतर त्यांनी बजरंग दल, व विश्व हिंदू परिषदेचे दायित्व सांभाळले व आपले संपूर्ण कार्य पणाला लावले. तसेच मुलींना संघटित करून संरक्षणासाठी त्यांना दुर्गा वाहिनीच्या शौर्य प्रशिक्षणासाठी पाठवले. या सगळ्या कार्यामधे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक रुग्णांना रक्त सुद्धा उपलब्ध करून दिले.
आणखी वाचा-बुलढाणा : पोलिसांच्या साक्षीने ग्रामपंचायतसमोर राडा, तिघा सदस्यांना बळजबरीने सोबत नेले
गौरक्षनासाठी सुद्धा कार्य केले. हे सगळे करत असतांना खरतर सागर यांनी आपली खरी ओळख समाजापासून लपवून कार्य केले. मुळात मुलगी असताना मुलगा म्हणून वयाची ३८ वर्ष समाजकार्यात घालविली आणि २० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या तेरा तुझको अर्पण, या सोहळ्यामधे सगळ्यांच्या साक्षीने आपण मुलगी असल्याचे जाहीर केले.
बालपणापासून सागर हा मुलांप्रमाने राहत होता. सर्व खेळ ते मुलांचेच खेळत होता. मार्गदर्शनामुळेच ३८ वर्षानंतर त्यांने स्वतःची खरी ओळख समाजापुढे आणली व या पुढे मुळ रुपात म्हणजे स्त्री म्हणूनच जगणार आहे. या साठी सगळ्यांच्या साक्षीने साधु संतांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच संतांच्या उपस्थितीत सागर चे संगरा असे नामकरण करून शास्त्रानुसार विधि सुद्धा करण्यात आला. यापुढे त्या कु. संगरा चुंबळकर या नावाने ओळखल्या जाणार आहे.
आणखी वाचा-‘समृद्धी’वरील असुविधांबाबत चार आठवडय़ांत उत्तर द्या; राज्य सरकार, ‘एमएसआरडीसी’ला न्यायालयाची नोटीस
सोहळ्यास अंजनगाव सुर्जी येथील अनंत विभूषित १००८ आचार्य जितेन्द्रनाथ महाराज (सभाचार्य विश्व मांगल्य सभा) यांची उपस्थिती होती. तसेच योगी शंकरनाथ महाराज (शिव गोरखनाथ संस्थान वाशीम) मोहन महाराज पाठक, प्रशांतजी हरताळकर (मार्गदर्शक विश्व मांगल्य सभा) डॉ. वृषाली जोशी (अ. भा. संगठन मंत्री विश्व मांगल्य सभा) मधुरा ताई लेंधे(विदर्भ प्रान्त अध्यक्षा,विश्व मांगल्य सभा) बालाजी महाराज देव, ह. भ. प नामदेव महाराज काकडे, ह. भ.प सागर महाराज पारिस्कर, ह. भ.प विजय महाराज गवळी, पंकज महाराज देव तसेच वाशीम येथील अनेक नागरीक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते.