लोकसत्ता टीम

गडचिरोली : एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम गर्देवाड्यात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर पहिल्यांदा एसटी बस सुरु झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. नऊ महिन्यांपूर्वी पोलिसांनी याठिकाणी पोलीस मदत केंद्र उघडून नक्षलवादी कारवायांवर अंकुश निर्माण केला होता. या भागातील नागरिकांनी आजपर्यंत गावात एसटी बस पाहिली नव्हती. पण ताडगुडा येथील पुलाचे आणि रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण करुन या भागात पहिल्यांचा एसटी बस पोहोचवण्यात प्रशासनाला यश आले. गर्देवाडा ते अहेरी अशी बसफेरी आता सुरु झाली आहे. त्यामुळे परिसरातील बारा गावांमधील नागरिकांसाठी मोठी सुविधा झाली आहे.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अतिसंवेदनशील गर्देवाडा येथे १५ जानेवारी २०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपासून तेथील परिसरातील नागरिकांना गडचिरोली पोलीस दलामार्फत विविध सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २२ सप्टेंबर रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी पहिली एस.टी. बससेवा सुरु करण्यात आली.

आणखी वाचा-‘समान धोरणा’चा फज्जा! ‘महाज्योती’चा प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा निर्णय

पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपूर्वी गर्देवाडा येथून एटापल्ली ते अहेरी आणि इतर मोठया गावांना जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नव्हता. गट्टा (जां) ते वांगेतुरी दरम्यान असलेला ताडगुडा येथील पुल देखील सुस्थितीत नसल्याने गर्देवाडा परिसरातील १२ गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या पाठपुराव्याने ताडगुडा येथील पुलाचे, तसेच रस्त्याचे बांधकाम युद्धस्तरावर पूर्ण करण्यात आल्याने आता महामंडळाची एसटी बसही गावात पोहोचू शकते.

महिलांच्या हस्ते पूजन

एसटी बसची सुरुवात करताना गावातील महिलांच्या हस्ते बसचे पुजन करुन ही बससेवा सुरु करण्यात आली. यावेळी एसटीचे चालक रामू कोलमेडवार व वाहक गणेश गोपतवार यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. वाहक गणेश गोपतवार यांनी नागरिकांना बसच्या प्रवासाचे टप्पे, बस तिकीटाचे दर बाबत विस्तृत माहिती दिली. या बसमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी, बँकेची व ईतर शासकिय कामे विनाविलंब करण्यासाठी मोठी मदत होईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे व महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे आभार मानले.

आणखी वाचा-नागझिराचा राजा ‘बाजीराव’पाठोपाठ आणखी एका वाघाचा मृत्यू

हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सीआरपीएफचे असिस्टंट कमाण्डंट संतोष डरांगे, पोलीस निरीक्षक जितेंद्र, पोमकें गर्देवाडा येथील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी शिंदे, उपनिरीक्षक संग्राम अहिरे, एसआरपीएफचे उपनिरीक्षक देवकुळे तसेच पोलीस अंमलदार आणि गर्देवाडा येथील नागरिक उपस्थित होते.