विवाहित प्रेयसीला पळवून नेल्यानंतर तिच्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी प्रियकरासह दोघांवर गुन्हे दाखल केले. सचीन (४०) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू (३५) आणि सचिन हे दोघेही मित्र होते. सचिन हा ऑटोचालक तर मोनू हा खासगी काम करतो. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. सचिनच्या पत्नी प्रिया (काल्पनिक नाव) हिच्याशी मोनूशी ओळख झाली. त्यानंतर मोनूचे सचिनच्या घरी येणे- जाणे वाढले. दोघांची मैत्री झाली. सचिन ऑटो घेऊन बाहेर पडला की प्रिया ही मोनूला घरी बोलवत होती. दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्याने वस्तीत चर्चा सुरु झाली. मात्र, सचिनला मोनूने विश्वासात घेतले.
हेही वाचा >>>अकोला: आता वेगळ्या वऱ्हाडाची मागणी करावी का?; आमदार रणधीर सावरकर
त्यानंतर मोनूचा प्रियावर जीव जडला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. विवाहित असलेल्या प्रियाला ५ वर्षांची मुलगी होती. त्यामुळे प्रियाने नकार दिला. मोनूने प्रियाला मुलीसह स्विकारण्याची तयारी दर्शवून पळून जाण्याचा बेत आखला. गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रियाला मोनूने पळवून नेले. त्यावेळी प्रियाने पतीच्या घरातील सोन्याचे दागिने आणि काही रक्कम सोबत घेतली होती. दोघेही काही दिवस नागपुरातून बाहेर राहिले. सचिनने पत्नी पळून गेल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. शेवटी मोनूने पोलिसांत जाऊन प्रियासोबत लग्न केल्याची कबुली दिली. तेव्हापासून सचिन आणि मोनूमध्ये वारंवार वाद होत होता. पत्नीने नेलेले दागिने आणि पैसे तो मोनूला परत मागत होता. तसेच पत्नीला सोडून देण्याची विनंती करीत होता. मोनूने त्याला पत्नीला विसरून जाण्यास सांगितले. त्यावरून दोघांत वाद सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सचिन हा ऑटोतून प्रवाशी घेऊन जात होता. मेडिकल चौकात मोनूला तो दिसला. मोनू आणि बॉबी यांनी सचिनवर प्राणघातक हल्ला केली. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.