लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गडचिरोली : तेंदू पानाच्या वाहतुकीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १ लाख ३० हजारांची लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तर कारवाईची चाहूल लागताच अहेरी पंचायत समितीचा लाचखोर प्रभारी गटविकास अधिकारी प्रतिक चन्नावार फरार झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तालुका पेसा समन्वयक संजिव येल्ला कोठारी (४२) व अनिल बुधाजी गोवर्धन (३०) या खाजगी व्यक्तीचा समावेश आहे.

तक्रारदाराने अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथून तेंदुपानाच्या वाहतुकीसाठी अहेरी पंचायत समितीमध्ये नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. दरम्यान प्रभारी गट विकास अधिकारी प्रतिक चन्नावार याने कार्यालयातील कंत्राटी पेसा समन्वयक संजिव कोठारी व अनिल गोवर्धन यांच्या मार्फत १ लाख ३० हजाराच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.

आणखी वाचा-दक्षिण मध्य रेल्वेच्या आठ गाड्यांना मुदतवाढ, ‘या’ शहरांमध्ये जाण्यासाठी झाली सुविधा

संपूर्ण पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहेरी येथे सापळा रचून आरोपींना लाच घेताना अटक केली. दरम्यान कारवाईची चाहूल लागताच प्रभारी गट विकास अधिकारी चन्नावार फरार झाला. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार अधिकाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.