लोकसत्ता टीम

भंडारा: करोना काळात ती घरातून बाहेर पडली आणि भरकटत भंडारा जिल्ह्यात पोहचली. दोन वर्ष तिने स्वाधारगृहात काढले. दोन वर्षानंतर ती भानावर आली. गावाची आठवण आलेल्या व जाणीव झालेल्या पश्चिम बंगालहून मोहाडीत पोहोचलेल्या ‘ती’ची ‘सखी वन स्टॉप’ने कुटुंबीयांसोबत भेट घडवून दिली. भंडारा पोलिसांनी सुखरुप तिला पश्चिम बंगाल राज्यातील तिच्या गावी सोडून दिले. मात्र गावी पोहचल्या नंतर दहा दिवसांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाल्याचे तिला कळले. एका डोळ्यात कुटुंबाला भेटल्याचे आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात पतीच्या मृत्यूचे दु:खाश्रू तिच्या वाट्याला आले.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Hyderabad Man Shoots At Girlfriend Father With Air Gun accused arrested
प्रेयसीला अमेरिकेला पाठवलं म्हणून संतापलेल्या प्रियकराने तिच्या वडिलांवर केला गोळीबार; कुठे घडली घटना?
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….

एखाद्या सिनेमाची पटकथा असावी अशी ही कहाणी आहे आशाकुमारीची (काल्पनिक नाव) ! आशाकुमारी मूळची पश्चिम बंगालमधील मिधेनपूर जिल्ह्यातील शुगनीवासा या गावची. मे २०२० मध्ये तिच्या घरात वाद झाले आणि ती रागात घराबाहेर पडली. सर्वत्र कोरोनाचे सावट होते. टाळेबंदी होती. या वातावरणात तिची मनस्थिती बिघडली. या गावातून त्या गावात. मिळेल त्या वाहनाने प्रवास करुन ती भंडारा जिल्हयातील मोहाडी येथे पोहचली. टाळेबंदीत गस्तीवर असताना १९ जून २०२० च्या रात्री विमनस्क अवस्थेत भटकत असलेली आशाकुमारी मोहाडी पोलिसांना दिसली. टाळेबंदी असल्याने कुटूंबाचा शोध घेणे शक्य नसल्याने तिला देव्हाडी येथील महिला स्वाधारगृहात दाखल करण्यात आले. दोन वर्षांनी ती भानावर आली. कुटुंबाची आठवण करू लागली.

आणखी वाचा-गोंदिया: गिधाडी येथील महिलांचा गावात दारूबंदीचा निर्णय

तेथील समुपदेशिका सविता मदनकर यांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेणे सुरू केले. मात्र, पदरी निराशाच पडली. अखेर भंडारातील ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या प्रशासक लता भुरे यांची मदत मागितली. त्यांनी दुभाषकाच्या माध्यमातून बंगाली भाषेतून संवाद साधून कसेबसे तिच्या गावाचे नाव मिळविले. गुगलवरून ते गाव शोधले. नंतर मोहाडी पोलिसांच्या मदतीने पश्चिम बंगालमधील झारग्रामचे ठाणेदार सौरभ चक्रवर्ती यांच्याशी संपर्क साधून कुटुंबीयांचा शोध घेतला. मात्र एकदा घराबाहेर पडलेल्या महिलेला पुन्हा घरात न घेण्याच्या आदिवासी समाजाच्या प्रथेमुळे त्यांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी तिच्या निष्कलंकपणाची खात्री दिली, तेव्हा घरात घेण्याची तयारी दर्शविली गेली. त्यानंतर भंडारा येथून पोलिस पथकासह लता भुरे आणि सविता मदनकर यांनी नुकतेच शुगनीवासा या तिच्या गावी जाऊन तिला कुटुंबाकडे सोपविले. ती कुटुंबात पोहोचली. मात्र, पतीची भेट तिच्या नशिबात नव्हती. १० दिवसांपूर्वीच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. एका डोळ्यात कुटुंबाला भेटल्याचे आनंदाश्रू आणि दुस-या डोळ्यात पतीच्या मृत्यूचे दुःख दिसून येत होते. मात्र ते स्वीकारुन पून्हा नव्याने सुरुवात करण्याचा सल्ला देत स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्या आणि पोलीस परतले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जुगार पौनीकर, संस्थेचे सचिव जया रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात मोहाडीचे ठाणेदार प्रदिप पुल्लरवार, स्वाधार देव्हाडीच्या अधिक सविता मदनकर तसेच केंद्र प्रशासक लता भुरे व वन स्टॉप सेंटर भंडारा येथील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.