नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्याने सध्या चर्चा नवा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतत होत आहे. येत्या काही दिवसात नवा मुख्यमंत्री ठरल्यानंतर लगेचच म्हणजे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असून त्याला नवे मुख्यमंत्री सामोरे जाणार आहेत. त्यामुळे त्याचे स्वरूप ’नवा गडी नवा राज’ राहण्याची शक्यता आहे.
सध्याच्या सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे होते व नागपूरकर देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री होते. आता नागपूर अधिवेशनाला मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शिंदेच नागपुरात येतात की, देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात ही माळ पडते याकडे नागपूरकर नागरिकांसह अधिवेशनाची तयारी करणाऱ्या प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला तोंड दिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा अपवाद सोडला तर ते उपमुख्यमंत्री म्हणून नागपूर अधिवेशनात उपस्थित राहात होते. हे येथे उल्लेखनीय. नवे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर त्यात विदर्भ आणि नागपूरचे किती मंत्री असतात हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा…नागपूर : सरस्वती शाळेच्या बसलचा भीषण अपघात, एक विद्यार्थी ठार, ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी
अधिवेशनाची तयारी सुरू
सामान्यपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते. दोन आठवडे चालते. त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अधिवेशनासंबंधीची सर्व कामे ९ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे आदेश विधिमंडळ सचिवालयाने नागपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. सध्या विधिमंडळातील आसन व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असून विधानभवनाच्या बाहेर फर्निचर ठेवण्यात आले आहे. मंत्र्यांचे बंगले, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था आणि अन्य देखभाल दुरुस्तीचे कामे निवडणूक काळापासूच सुरू आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वीच कार्यादेश देण्यात आले होते. मात्र, निवडणुकांमुळे काही कामांना विलंब होण्यााची शक्यता लक्षात घेऊन पुढच्या काळात याला गती देण्यात येणार आहे.
हेही वाचा…फडणवीसांच्या नागपुरात ना आरती, ना यज्ञ, पण लोकांना विश्वास ‘तेच’ होणार …
प्रशासकीय यंत्रणेची धावपळ
एक महिन्यापासून संपूर्ण महसूल व अन्य प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त होती. दोनच दिवसांपूर्वी मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र पुढच्या महिन्यात हिवाळी अधिवेशन असल्याने त्याच्या तयारीला ही यंत्रणा लागणार आहे. अधिवेशनासाठी लागणाऱ्या वाहनांची जुळवाजुळव करण्यासाठी विविध जिल्ह्यांना यापूर्वीच पत्र पाठवण्यात आले आहे. साधारणपणे बाहेरून वाहने मागवताना त्यावर स्थानिक चालकांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही सर्वसंबंधितांना देण्यात आल्या आहेत.