नागपूर : विधानसभा निवडणूक आटोपताच नागपुरातील सराफा बाजारात काही तासातच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये सोने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहक चिंतेत होते. परंतु सोमवारी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आल्यावर ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

नागपुरसह राज्यात दिवाळीत सोन्याचे दर उच्चांकीवर होते. त्यानंतही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली. त्यानंतर दरात प्रथम मोठी घसरण झाली. परंतु राज्यातील विधानसभा निवडणूकीदरम्यान पून्हा सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. नागपुरातील सराफा बाजारत धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये होते.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हेही वाचा…जेईई परीक्षेत मोठा बदल, या विद्यार्थ्यांना फटका बसणार

लक्ष्मीपूजनाला (१ नोव्हेंबर) वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले. नागपुरात २५ नोव्हेंबरला बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार ३०० रुपये होते. हे दर काही तासानंतर दुपारी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात सकाळी बाजार उघडल्याच्या तुलनेत दुपारी सोन्याच्या दरात २४ कॅरेटमध्ये ४०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ४०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ३०० रुपये, १४ कॅरेटमध्ये २०० रुपये प्रति दहा ग्राम अशी घट नोंदवण्यात आली. दरम्यान भविष्यात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने- चांदीच्या दागिन्यात गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचाही सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

हेही वाचा…सिंदखेडराजा, मेहकरला मिळाले नवीन नेतृत्व! तीन दशकानंतर…

चांदीच्या दरातही घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोंबरला प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर २५ नोव्हेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर ९० हजार ३०० रुपये प्रति किलो होते. हे दर सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी ८९ हजार ९०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे नागपुरात चांदीच्या दरात काही तासातच सोमवारी ४०० रुपयांची घट नोंदवण्यात आली.

Story img Loader