काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो  यात्रा काढत लक्ष वेधून घेतले होते.त्याच धर्तीवर प्रदेश काँग्रेसने ३ ते १२ सप्टेंबर दरम्यान जनसंवाद पदयात्रा काढण्याचे घोषित केले आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेचे नियोजन केले आहे. तीन पातळीवर आयोजन होत आहे.विभागीय यात्रा समन्वयकांनी जिल्हाध्यक्षासोबत समन्वय साधत जिल्ह्यात होणाऱ्या यात्रेसाठी किमान १०० पदयात्रीची नेमणूक करायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> चंद्रपूर: ‘हर घर झेंडा’ उपक्रमाचा खर्च कर्मचाऱ्यांच्या खिशातून! ; मासिक वेतनातून रक्कम कपातीचा ‘सीईओं’चा आदेश

हे पदयात्री आरंभ ते समारोपपर्यंत यात्रेत सहभागी असतील.जिल्हा प्रभारींनी जिल्हाध्यक्षासोबत समन्वय साधून जिल्ह्यात होणाऱ्या यात्रेसाठी किमान १०० पदयात्रींची नेमणूक करावी.ते जिल्हा यात्रेत सहभागी होतील. जिल्हाध्यक्षांनी ब्लॉक अध्यक्षांना सोबत घेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान २०० पदयात्रींची नेमणूक करावी.ते विधानसभा क्षेत्रनिहाय यात्रे सहभागी होतील, असे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सुचविले आहे.यात्रेत गांधी टोपी घालने अनिवार्य आहे.सकाळी सहाला प्रार्थना करीत यात्रा सुरू होणार आणि दिवसभर विविध उपक्रम केल्यानंतर रात्री साडे नऊला सभा आटोपून विश्रांती घेणार. यात्रेत महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार तसेच स्थानिक मुद्दे यावर लोकांशी संवाद साधायचा आहे.सुसज्ज रथात जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळापासून यात्रा सुरू करण्याची सूचना आहे.