नागपूर : एखाद्या मुलगा वारंवार सांगूनही ऐकत नसेल, तर त्याची आई मुलाला तुझ्या जिभेला चटके द्यायला पाहिजे असे म्हणत असते. त्याच अर्थाने राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली” असा खुलासा भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी नागपुरात सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती येथे बोलताना बोंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. या प्रकरणात त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ते रात्री नागपुरात दाखल झाले. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील खुलासा केला.खरे तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा मात्र राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.

हे ही वाचा…नागपूर : संतप्त गावकऱ्यांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला, काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिकेबाबत बोलताना बोंडे म्हणाले “

आमच्या वऱ्हाडातील बोली भाषेनुसार एखादा मुलगा वारंवार चुका करत असेल किंवा सांगूनही त्याच्यात सुधारणा होत नसेल तर आईचा सुद्धा रागाने त्याला थांब तुझ्या जिभेला चटके देतो, असे म्णते. याच अर्थाने मी बोललो. राहुल गांधी जर वारंवार आरक्षण काढून घेण्याबद्दल बोलत असेल तर त्यावर राग व्यक्त करण्यासाठी मी तसे वक्तव्य केले. त्यांनी असे बोलणे टाळले पाहिजे. अनुसूचित जातीच्या विरोधात वारंवार बोलणे त्यांचे सुरू असते त्यामुळे मी हे वक्तव्य केले असल्याचे डॉ. बोंडे म्हणाले.

हे ही वाचा…अकोला : मनसैनिक जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; नेमकं घडलं काय?

काँग्रेस नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा राहुल गांधीला असे वक्तव्य करु नये हे सांगितले पाहिजे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी फेक नारेटिव्ह पसरवला होता. संविधान बदवले जाईल असा प्रचार केला होता. त्यावेळी लोकांनी काँग्रेसला मतदान केले. तेच काँग्रेसवाले आता या लोकांना दुखावत आहे. त्यामुळे काँग्रेसने राहुल गांधी यांना सांगायला पाहिजे की त्यांना का दुखवता.

हे ही वाचा…गडचिरोली : रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडले

माझ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर उद्या भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत विदर्भातील विविध पोलीस ठाण्यात जाणार आहे. भारतातील ७० टक्के आदिवासी अनुसूचित जातीचे लोकांच्या मनात राहुल गांधींनी भीती निर्माण केली. आम्ही आरक्षण रद्द करू शकतो, अशी भीती दाखवली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गोष्टी त्यांनी परदेशात जाऊन वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ,असे बोंडे म्हणाले. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती देशाच्या विरोधात अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी बोलतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असेही बोंडे म्हणाले. त्यांना मुस्लिमांचा लांगुलचालन करायचा आहे. त्यांना अनुसुचित जाती जमातीच्या लोकांचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यानी राहुल गांधीच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा मी समर्थन करत नाही .कारण मी हिंसेचे समर्थन करत नाही असेही डॉ. बोंडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child vmb 67 sud 02