लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन या गावातील प्रेमियुगलाने साखरखेर्डा गावानजिक असलेल्या सूतगिरणी परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याला काही तास होत नाही तोच आज, शनिवारी प्रेमीच्या वडिलांनी आत्महत्या केली. यामुळे अवघा बुलढाणा जिल्हा हादरला.

समाधान खिल्लारे ( ५५) असे आज शनिवारी सकाळी आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब सकाळी उघडकीस आल्यावर साखर खेर्डा नगरीत व नंतर खिल्लारे यांचे मूळ गाव असलेल्या शेंदुर्जन गावात खळबळ उडाली.

आणखी वाचा-अमरावती : दोन मित्रांनीच केली तरूणाची हत्‍या

शुक्रवारी सूतगिरणी परिसरात आत्महत्या करणाऱ्या गोपाळ खिल्लारे याचे ते वडील होत. २२ वर्षीय गोपाळ खिल्लारे व तेरा वर्षीय साक्षी संतोष अंभोरे यांनी शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ समाधान खिल्लारे यांनी आत्मघात करून घेतला. सामाजिक बदनामी व संभाव्य कारवाईच्या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After couple suicide boyfriends father commits suicide in buldhana scm 61 mrj