नागपूर : मान्सूनच्या एक महिनाआधीच “मोका” चक्रीवादळाने आपला मोर्चा वळवला होता. या चक्रीवादळमुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण असे काही झाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता आणखी एक नवे चक्रीवादळ “फॅबीयन” तयार झाले आहे. दक्षिण हिंद महासागरात “फॅबीयन” ने धडक दिली असून ते हळूहळू किनाऱ्याकडे सरकत आहे. या चक्रीवादळात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने समुद्रकिनाऱ्यालगतच्या राज्यांना आणि ज्या देशांच्या सीमारेषा समुद्रकिनाऱ्या लगत आहेत त्यांना हवामान विभागाच्या माध्यमातून अलर्ट जारी करण्यात आला आहे.मात्र, या चक्रीवादळाला किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.

हेही वाचा >>>चंद्रपूर: रावत गोळीबार प्रकरणाचा उलगडा; काँग्रेस समर्थित दोन भावंडांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

मात्र, याचा परिणाम आतापासूनच जाणवत पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पाऊस आणि देशातील काही राज्यात उष्णता वाढली आहे. या चक्रीवादळचा भारतावर थेट परिणाम होणार नाही, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After cyclone moka now the crisis of cyclone fabian rgc 76 amy
Show comments