नागपूर : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होऊन त्यांनी शपथही घेतली. आता प्रतीक्षा आहे त्यांच्या नागपूर आगमनाची. ते नागपुरात येणार म्हणून शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ सज्ज ठेवण्यात आले आहे. तेथील कर्मचारी फडणवीस साहेब येणार म्हणून आनंदी आहेत. मात्र त्यांच्या नागपूर आगमनाची तारीख सारखी बदलत आहे. यामुळे ‘देवा भाऊ लवकर या, रामगिरी आपली वाट पहात आहे,’ असे तेथील कर्मचारी आणि भाजपचे कार्यकर्ते म्हणू लागले आहे.

२०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे वास्तव्य रामगिरी बंगल्यावर होते. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे युतीमधून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि पहिले अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि राज्यात महायुतीचे सरकार आले. यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. त्यामुळे सहाजिकच एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान देवगिरी होते. त्यामुळे जवळपास पाच वर्षे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना दूर राहावे लागले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आणि राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आता त्यांचा मुक्काम रामगिरीवर राहणार आहे. रामगिरी बंगल्याबाहेर त्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.

स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Mahant Ramgiri Maharaj on National Anthem
Mahant Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; टागोर यांच्या नोबेल पुरस्काराबाबत म्हणाले…
Shakambhari Navratri festival of Tuljabhavani Devi begins in dharashiv
आई राजा उदोऽऽ उदोऽऽच्या गजरात घटस्थापना, तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ
Chief Minister , devendra Fadnavis, nagpur,
“त्यामुळेच मी तीन वेळा मुख्यमंत्री होऊ शकलो”, फडणवीसांनी कारणच सांगितले
Threat to bar owner Chikhli , Chikhli bar Loot ,
बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…
Chief Minister Devendra Fadnavis decision regarding the police
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, पारंपरिक स्वागत, पोलीस मानवंदना बंद

हेही वाचा…‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील शासकीय बंगल्याचा पत्ता बदलला आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना देवगिरी या शासकीय निवासस्थानातून ते आपले कामकाज करत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी झाल्यामुळे बंगल्याबाहेर ‘देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस’ नावाची पाटी लावण्यात आली आहे, तर देवगिरी बंगल्याबाहेर उपमुख्यमंत्री ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा…नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस १२ डिसेंबरला येणार असल्यामुळे रामगिरी निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. विमानतळासह रामगिरीवर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. मात्र १२ ची १३ डिसेंबर झाली. त्यानंतर १३ ची १५ तारीख झाली. त्यामुळे आता रामगिरीवरील कर्मचारी आणि भाजपचे कार्यकर्ते देवाभाऊ लवकर या… रामगिरी आपली वाट पहात आहे, अशी मागणी करु लागले आहे.

Story img Loader