नागपूर : जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी सरकारला ८ दिवसांचा अवधी दिला आहे, त्यामुळे ओबीसी समाज संतप्त असून आज नागपुरात विविध ओबीसी संघटनांची बैठक बोलावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जरांगे पाटील यांनी काल जाहीर सभेत ५० टक्क्यांच्या मर्यादेत मराठा समाजाला आरक्षण हवे असल्याचे म्हटले होते. यामुळे ओबीसी आक्रमक झाला आहे. सोमवारी (१६ ऑक्टोबरला) सकाळी ११.३० वाजता नागपुरातील रविभवनमध्ये ओबीसी संघटनांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ओबीसी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करतानाच सरकारकडून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठीची रणनिती आखली जाणार आहे.

हेही वाचा – वाशिम : सरकारकडून पदवीधर बेरोजगारांची थट्टा, आमदार धीरज लिंगाडे म्हणतात, कंत्राटी भरती…

हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, मनसेची मागणी

नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीमसह संपूर्ण राज्यभरात ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ५० हून अधिक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After jarange patil meeting obc aggressive various obc organizations gathered in nagpur rbt 74 ssb
Show comments