लोकसत्ता टीम

गोंदिया : गोंदिया-कोहमारा मार्गाने धानाचे पोते भरून ट्रक जात होता. ट्रकच्या मागे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे चारचाकी शासकीय वाहन येत होते. ते वाहन बघून भरधाव वेगात ट्रक चालवित असताना नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना भडंगा गावाजवळ घडली.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
China Accident
China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी, दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ

गोंदिया-कोहमारा मार्गाने एमएच ४०, एके ००९८ क्रमांकाचा ट्रक धानाचे पोते घेऊन जात होता. दरम्यान भडंगा गावाजवळ भरधाव ट्रक रस्त्याखाली उतरून उलटला. दरम्यान एका झाडालाही धडक दिली. यात ट्रकचा चेंदामेंदा झाला. ट्रकमधील धानाचे पोते अस्ताव्यस्त पडले. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, धान भरून जाणारा ट्रक भरधाव जात होता. ट्रकच्या मागे वाहतूक शाखेचे शासकीय वाहन येत होते.

आणखी वाचा-चंद्रपूर : इरई धरण परिसरात परदेशी पाहुण्यांचे आगमन

कदाचित त्या वाहनाला बघून ते आपल्या मागावर तर नाही हे ग्राह्य धरून ट्रक चालकाने आपली गती वाढविली असता अपघात घडला. दरम्यान ट्रकच्या मागे येत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने जखमी चालकाला बाहेर काढून आपल्या वाहनाने उपचाराकरिता गोंदियाला नेले. ट्रकमधील धानाचे पोतेदेखील अस्ताव्यस्त पडले. अनेक पोते फाटून त्यातील धान खाली पडले. वाहतूक पोलिसांचे वाहन बघून भितीपोटी वेगाने ट्रक चालविला असावा, त्यातूनच हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी या अपघाताची नोंद गोरेगांव पोलीस ठाण्यात केली आहे.