बुलढाणा : मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण ओवरफ्लो झाले असून शंभर टक्के भरले आहे. काल शुक्रवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या अनेक गांवासह मलकापूर शहरातील काही वस्त्यात पाणी साचले आहे.अनेक घरांत पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. दाताळा गावात अक्षरशः हाहाकार उडाल्याचे चित्र आज शनिवारी दिसून आले.
सततच्या पावसाने धरणातील जलसाठा वेगाने वाढला शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नंतर धरण शंभर टक्के भरलं आहे. धरण ओवरफ्लो झाल्याने मध्यरात्री च धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. दरवाजा क्रमांक एक,अकरा आणि 6सहा हे दोन इंचाने उघडण्यात आले. पूर नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. यातून ४१९ क्यूसेकं इतका विसर्ग सोडण्यात येत आहे.यामुळे नदीकाठच्या गावांना धोका झाला. गावकऱ्यांना सतर्क करण्यात आले . दरम्यान पुरामुळे मलकापूर येथील नळगंगा नदी पात्रानजीक असलेल्या वस्त्या जलमय झाल्या आहे.प्रामुख्याने रोहिदास नगर, सुभाषचंद्र बोस नगर, पारपेठ या सखल भागातील वस्त्यातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले .यामुळे गोर गरिबांच्या गृहोपयोगी साहित्य, धान्य ,कपडे आदींची नासाडी झाली आहे.
हे ही वाचा…धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर लांबच लांब रांगा, पण कमालीची शिस्तबद्धता…
दरम्यान मलकापूर आमदार राजेश एकडे, माजी आमदार चैनसुख संचेती, काँगेस, भाजप पदाधिकारी यांनी आज शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी दाताळा गावाला भेट दिली. ग्रामस्थशी संवाद साधून दिलासा दिला. यंत्रणा कडून नुकसाणीची माहिती घेत तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहे. अनेक गावक्त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.जनतेचा संताप लक्षात घेता पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जलद कृती पथक ही घटनास्थळी दाखल झाले. पूर सदृश्य परिस्थितीने अनेकांचे घर उध्वस्त झाले असून परिवार, पशु यांना मिळेल तिथे आसरा घेतला. दुसरीकडे मोताळा तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी रात्री कोसळधार पाऊस झाला.यामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे. काँग्रेसच्या जयश्री शेळके यांनी स्थानिय पदाधिकाऱ्या सह पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.तसेच मोताळा तहसीलदार यांच्याशी संवाद साधून पंचनामे आणि मदत करण्याची मागणी केली.
हे ही वाचा…बिबट्याच्या “त्या” सवयीने गावकरी दहशतीत
मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील दीडशे घरात पाणीच जमा झाल्याचे भीषण चित्र आहे. यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नळगंगा धरणातून रात्रीपासून विसर्ग सुरू झाला. दाताळा सह काही गावातील नागरिकांना आपल्या याची माहितीच नसल्याने शेकडो परिवाराना आप आपल्या घरातील सामान काढण्यासही वेळ मिळाला नाही .इतकेच काय तर अनेक जण झोपेत असतानाच घरात पाणी शिरल्याने त्यांची रात्रीच्या अंधारातच तारांबळ उडाली नागरिकांनी एकमेकांना सतर्क करून बाहेर निघण्यास सांगितले .यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
खडकपूर्णा धरण ‘ओवरफ्लो’! सात दारे उघडली
मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसाने देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा)नजिकचे खडकपूर्णा धरण ओवरफ्लो झाले आहे. यामुळे धरणाचे सात वक्राकार दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या सर्व गावांना धोका निर्माण झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.