नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यात आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे कुख्यात डॉन दाउदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्र लिहीत जाब विचारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रात दानवे यांनी फडणवीस यांना लिहले ही, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून दिसले. पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमिल शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहे. दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ‘ईडी’ने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे.

हेही वाचा – ‘हात नका लावू कानाला, भाव द्या धानाला’, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक

हेही वाचा – विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडूनच आंदोलन, काय आहे कारण जाणून घ्या…

नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत. तशाच भावना प्रफुल्प पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी आशा बाळगतो, असेही दानवे यांनी फडणवीस यांना पत्रातून म्हटले. त्यामुळे नवाब मलिकनंतर आता अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हेही विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After nawab malik praful patel on opposition radar leader of opposition in legislative council danve letter to devendra fadnavis mnb 82 ssb