नागपूर : Kuno National Park cheetah Pawan And Asha नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणले खरे, पण या चित्त्यांना कदाचित मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आवडले नसावे. ‘ओबान’ उर्फ ‘पवन’ याने दोनदा कुनोच्या जंगलातून बाहेर धूम ठोकली. आता ‘आशा’ ही मादी चित्तादेखील उद्यानातून बाहेर पडली आहे. त्यामुळे वनखात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पवन’ हा दोनदा उद्यानातून बाहेर पडला. दुसऱ्यांदा तो उत्तरप्रदेशच्या सीमेवर जाऊन पोहोचला. महत्प्रयासानंतर त्याला उद्यानात परत आणण्यात यश आले. आता मादी चित्ता ‘आशा’ कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर पडली आहे. गेल्या चार दिवसांपासून ती बाहेरच आहे. शिवपूरी जिल्ह्यातील बैराड तहसीलच्या धोरिया गाझीगढच्या हिरवाईत तिचे शेवटचे ठिकाण होते. कुनो वनखात्याचे पथक आता त्याठिकाणी पोहोचले असून तिला लावलेल्या ‘रेडिओ कॉलर’च्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधला जात आहे.

हेही वाचा >>> रानटी हत्तींचे गोंदिया जिल्ह्यात पुनरागमन; नवेगावबांधकडे कूच, बसवोडन गावात अलर्ट

या चार दिवसात तिने एकदाही शिकार केलेली नाही, त्यामुळे खात्याचे अधिकारी चिंतेत आहेत. आधीच एका महिन्याच्या कालावधीत दोन चित्ते मृत्युमुखी पडले. २७ मार्चला नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता ‘साशा’ हिचा किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. तर २४ एप्रिलला ‘उदय’ या चित्त्याचा हृदय निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. काहीही खाल्ले नसल्याने ‘आशा’ची तब्येत बिघडू शकते आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांमधील चिंता वाढली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After pawan asha also ran away and the forest officials exhausted rgc 76 ysh
Show comments