वर्धा: मुलींना लग्नाचे आमिष देत फसवणूक करण्याचे प्रकार नवे नाही. मात्र, फसवणूक झाल्यावर पोलीसांकडे तक्रार करण्याची हिम्मत काहीच दाखवितात. शहरातील एका तरुणीची शादाब खलील खान याच्याशी फेसबुक माध्यमातून २०२० मध्ये ओळख झाली. २०२१ मध्ये मोबाईल माध्यमातून संवाद सुरू झाला.
त्याचे मैत्रीत रूपांतर झाल्यावर दोघेही एकमेकांना विविध ठिकाणी भेटू लागले. फोनवर तासनतास बोलणे होतेच. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सदर तरुणीच्या वाढदिवसाला आरोपी शादाब याने तिला प्रपोज केले. नंतर काही काळाने तिला घरी बोलावून जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तो शब्दापासून फिरला.
हेही वाचा… अकोल्यात कोविडचा धोका; चाचण्यांच्या प्रमाणात वाढ
२१ डिसेंबर २०२३ रोजी पीडित तरुणीच्या भावाच्या मित्राकडून शादाबने १० डिसेंबर २०२३ रोजी दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचे समजले. फसवणूक करीत दुसरीशी संसार थाटला म्हणून पिडीतेने पोलीस तक्रार दाखल केली आहे. आरोपी विरोधात अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.