नागपूर:  दरवर्षी नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते. या काळात दोन बंगले कायम चर्चेत असतात. पहिला बंगला रामगिरी जो मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे आणि दुसरा देवगिरी जो उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. आता यात आणखी एका बंगल्याची भर पडली आहे. त्याचे नाव आहे विजयगड. अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच नागपुरात दाखल होत असल्याने येथे मंत्री, नेत्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी होते. सर्वाधिक वर्दळ असते ती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी. म्हणजे रामगिरीवर. त्यानंतर क्रम लागतो तो उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान देवगिरीचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 या पूर्वी युती, आघाडीच्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री व एक उपमुख्यमंत्री अशी दोनच सत्ता केंद्र असायची. आता सरकार महायुतीचे आहे. यात दोन पक्षांचे दोन उपमुख्यमंत्री आहेत.देवेंद्र फडणवीस यांना देवगिरी बंगला देण्यात आला. आता प्रश्न होता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नवीन बंगल्याचा शोध घेण्याचा.  त्यासाठी रविभवन परिसरातील एका बंगल्याची निवड करण्यात आली. त्याला विजयगड असे नाव देण्यात आले. अधिवेशन काळात अजित पवार यांचा मुक्काम या बंगल्यात असेल. यामुळे  सत्ता वर्तुळातील महत्त्वाच्या शासकीय बंगल्यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After ramgiri devagiri now vijaygad the official residence of the third chief minister in nagpur cwb 76 amy