नागपूर : ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन रेल्वेगाड्यांच्या भीषण अपघातात मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाली आहे. या घटनेनंतर रेल्वेवाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागपूरमार्गे धावणारी २२५१२ कामख्या-एलटीटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.
नागपूरमार्गे धावणारी १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस शनिवारी नियोजित वेळेपेक्षा सात तासांहूनही अधिक उशिरा धावत होती. ०१०३३ मुंबई-नागपूर स्पेशल गाडी साडेसहा तास, १३७२४ दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस २.१० तास, ०७२५६ सिकंदराबाद-पाटना एक्स्प्रेस २.१० तास, ०४१३३ सिकंदराबाद-सफरदरगंज स्पेशल गाडी ५.५० तास, १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस २.४० तास, १२६२६ दिल्ली-तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस सव्वासहा तास, १२५७८ म्हेसुर-दरभंगा एक्स्प्रेस सव्वादोन तास, १८०३० शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस ३.५० तास, १२९०६ शालीमार-पोरबंदर एक्स्प्रेस चार तास, ०५२७१ मुजफ्फरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ४.५० तास, १३५३३ एर्नाकुलम-बरौनी एक्स्प्रेस साडेतीन तास आणि १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस २.४० तास विलंबाने धावत होती.