लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर: प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या प्रियकराने इहलोकातील जीवनयात्रा संपवली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आणखी वाचा-प्रियकराची मारहाण, पोलिसांचेही तक्रारींकडे दुर्लक्ष; कंटाळलेल्या प्रेयसीने अखेर उचलले टोकाचे पाऊल…
जीम ट्रेनर आकाश (२३, वाठो़डा) असे मृताचे नाव आहे. आकाशच्या प्रेयसीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो नैराश्यात गेला होता. १६ जुलै रोजी त्याने घरी विषारी गोळ्या घेतल्या. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आईवडील आणि भाऊ आहे. या घटनेमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.