नागपूर : कर्नाटकातील पराभवानंतर प्रदेश भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज नाही. राज्यात भारतीय जनता पक्ष हा सर्वच निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले. ते साेमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही ५१ टक्के मते घेण्याची तयारी करीत आहोत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला याची कारणे वेगळी आहेत. तेथील राजकारण, मुद्दे वेगळे आहेत. कर्नाटकचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही. एखाद्या निवडणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या निवडणुकीतही तो होईल असे नाही, असेही बावनकुळे म्हणाले. प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केल्याने राज्यातील महापालिका निवडणुका लांबल्या आहेत. राष्ट्रवादीने याचिका मागे घेतली तर निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, याकडे बावनकुळेंनी लक्ष वेधले.

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका नाहीत

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील, अशी शक्यता आज तरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतरही सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the karnataka election defeat bjp does not need self reflection in maharashtra chandrasekhar bawankule cwb 76 ysh
Show comments