भंडारा: सारस पक्षाला सॅटेलाईट टॅगिंग करणार असल्याची घोषणा वनमंत्री मुनगंटीवार यांनी करताच जिल्हा प्रशासनाला धडकी भरली असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. कारण, जिल्ह्यातील अनेक अवैध धंदे वैनगंगा नदीच्या काठावर होत असतात. त्यामुळे सारस पक्षाला सॅटेलाईट टॅगिंग झाल्यानंतर ते नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जणू ‘वॉच’ ठेवतील आणि त्याची माहिती थेट मंत्रालयाला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वन विभागाद्वारे सारस पक्षाचे सॅटेलाईट टॅगिंग केले जाणार असल्याने जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व अवैध व्यवसाय उघड होणार आहे. विशेष म्हणजे, या सॅटेलाईट टॅगिंगवर मंत्रालयाची करडी नजर राहणार असल्याने भंडारा जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे. सारस पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्याकरिता न्यायालयानेदेखील वनविभागाला फटकारले आहे. ही बाब लक्षात घेत आता सारस संवर्धन आणि संख्या वाढविण्यासाठी या पक्ष्यांचे सॅटेलाईट टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

हेही वाचा… सारस पक्ष्यांचे होणार सॅटेलाईट टॅगिंग, वनमंत्र्यांचे ट्वीट; वाचा सविस्तर…

सारस पक्षी सतत स्थलांतरण करणारा पक्षी आहे. त्याला पाणी असलेले क्षेत्र, विशेषत: नदी काठ अथवा नदी पात्राजवळील भूभाग सहवासासाठी आवडतो. त्यामुळे साहजिकच सॅटेलाईट टॅगिंग केलेले सारस भंडारा जिल्ह्यातील नदी पात्राजवळ जाणारच. यामुळे मंत्रालयही नदीपात्राजवळ पोहोचणार आणि यातूनच तेथे सुरू असलेल्या अवंध धंद्यांचा भंडाफोड होणार. अवैध वाळू तस्करी, अवैध दारूच्या हातभट्ट्या, नदी पात्रातून होणारी तस्करी शासनासमोर उघड होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the satellite tagging of the cranes the bhandara district government will get information about the illegal activities going on in the river bed ksn 82 dvr