नागपूर: १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या व नंतरच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा या मागण्यांसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विधान परिषदेतील डॉ. विक्रम काळे यांच्यासह इतर आमदारांनी आंदोलन केले. शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान द्या, प्राध्यापक व शिक्षक-कर्मचान्यांची रिक्त पदे भरा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाढीव पदांना मान्यता द्या. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांची रिक्तपदे भरा, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढा, केंद्रीय आश्रमशाळांना वेतन अनुदान देवून शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीत मान्यता द्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीईची थकित रक्कम द्या आदी मागण्या शासनाकडे केल्या.. याप्रसंगी डॉक्टर विक्रम काळे, सुधीर तांबे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक, सतीश चव्हाण, अरुण लाड उपस्थित होते.
शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा; विधान परिषदेच्या सदस्यांचे आंदोलन
शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान द्या, प्राध्यापक व शिक्षक-कर्मचान्यांची रिक्त पदे भरा अशा मागण्या सदस्यांनी केल्या.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
नागपूर
First published on: 29-12-2022 at 12:24 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation members of vidhanparishad demands of implementation old pension scheme for teachers employees mnb 82 tmb 01