नागपूर: १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या व नंतरच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा या मागण्यांसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विधान परिषदेतील डॉ. विक्रम काळे यांच्यासह इतर आमदारांनी आंदोलन केले. शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान द्या, प्राध्यापक व शिक्षक-कर्मचान्यांची रिक्त पदे भरा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाढीव पदांना मान्यता द्या. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांची रिक्तपदे भरा, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढा, केंद्रीय आश्रमशाळांना वेतन अनुदान देवून शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीत मान्यता द्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीईची थकित रक्कम द्या आदी मागण्या शासनाकडे केल्या.. याप्रसंगी डॉक्टर विक्रम काळे, सुधीर तांबे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक, सतीश चव्हाण, अरुण लाड उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा