चंद्रपूर: ओबीसींच्या विविध मागण्यांसह मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जनता महाविद्यालयजवळ चक्का जाम आंदोलन करून चंद्रपूर-नागपूर महामार्गावर वाहतूक अडवून धरण्यात आली.

ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर शुक्रवारी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. आणि विजय बलकी, प्रेमानंद जोगी अन्नत्याग आंदोलनाला बसले त्यानंतर झालेल्या ओबीसी महासंघाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. आज जनता कॉलेज नागपूर महामार्गावर स्थानीय जनता काॅलेज चौकामधे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विधानपरिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर सहीत सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत

हेही वाचा – Nagpur Rain : नागपुरात महापूर, एकाचा मृत्यू, ३५० जणांना सुरक्षित स्थळी हलवले

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमापत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह या मागण्यांसह सुरु झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होत चालले आहे. ओबीसी कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयात प्रतिबद्द केले या वेळी बबनराव फंड, दिनेश चोखारे, नंदू नागरकर, अनिल धानोरकर, रवींद्र शिंदे, राजेश नायडू, पप्पू देशमुख, कुणाल चहारे, महेश खंघार,अनिल शिंदे, निलेश बेलखेडे,रोशन पचारे, हितेश लोडे, गणेश आवारी ,पांडुरंग टोंगे, विकास विरुतकर, सुनीता लोढिया, मनीष बोबडे, माया ठावरी, कुसुम उदार, गणेश आवळे, श्याम लेडे, गणेश झाडे, योगेश बोबडे, अक्षय येरगुडे, विनोद निब्राड, बाळा पिंपळशेंडे, अशोक उपरे, भाऊराव झाडे, भाविक येरगुडे, राहुल भोयरसहीत अनेक ओबीसी कार्यकर्ते सामील झाले.

हेही वाचा – चिखलीतील शासकीय वसतिगृहातील ६ विद्यार्थिनींना विषबाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरू; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

रविवार २४ सप्टेंबरला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरापर्यंत प्रेतयात्रा काढण्यात येणार आहे.

Story img Loader