बुलढाणा : सियाचिन ग्लेशियरमध्ये कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराने निधन झालेल्या अक्षय लक्ष्मण गवते यांच्या पार्थिवावर आज पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) येथे शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित लष्करी जवान व पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. शोकग्रस्त आप्तगण व देशप्रेमी ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

यापूर्वी काल रविवारी ( दि. २२) संध्याकाळी अग्निवीर गवते यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान संभाजीनगर येथील विमानतळावर उतरले. रात्री त्यांचे पार्थिव संभाजीनगर येथील लष्करी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आज सोमवारी (दि २३) सकाळी पावणे अकराच्या सुमारास लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव पिंपळगाव सराई येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातलग, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची रीघ लागली. या वीर जवानाच्या पार्थिवाची गावातून परिक्रमा काढण्यात आली. यावेळी हजारो देशप्रेमींच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुलगाव (वर्धा) येथील जवान व पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. वडील लक्ष्मण गवते यांनी मुखाग्नी दिला.

Vikas Walkar Shraddha Walkar father death
श्रद्धा वालकरच्या अस्थिविसर्जनाचे कार्य अधुरेच राहिले, वडिल विकास वालकर यांनी घेतला जगाचा निरोप
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devotees take boat rides at the Sangam during ongoing Mahakumbh Mela, in Prayagraj, Uttar Pradesh, Friday, Feb. 7, 2025.
Mahakumbh 2025 : “महाकुंभमेळा चेंगराचेंगरीत मी माझी आई गमावली, आता तिच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी मला…”, मुलाने व्यक्त केली खंत
Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
right to die with dignity
‘सन्मानाने मरण्याचा अधिकार’ म्हणजे काय? ‘हे’ राज्य ठरणार इच्छा मरणाचा अधिकार देणारं देशातील दुसरं राज्य
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव

हेही वाचा – “गड किल्ले भाडेतत्त्वावर, ही तर इतिहासाशी बेईमानी”, मनसेचा जनआंदोलनाचा इशारा

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, संजय गायकवाड, धीरज लिंगाडे, माजी आमदार विजयराज शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, स्वाभिमानीचे रविकांत तुपकर, शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके, सेनेचे नरेंद्र खेडेकर, बुलढाणा एसडीओ राजेंद्रसिंह जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाद्रन लीडर( निवृत्त) रुपाली सरोदे, सैनिक कल्याण संघटक विष्णु उबरहंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह हजारो शोकाकुल नागरिक हजर होते. शेकडो विद्यार्थी हाती तिरंगा घेऊन हजर होते.

हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

युनीट ६९ मैदानी रेजिमेंटमध्ये ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचिन ग्लेशियर भागात अक्षय गवते कर्तव्यावर होते. सैन्यात ९ महिने २१ दिवस सेवा दिली. २० ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावल्यानंतर मध्यरात्री झोपेतच हृदयाघात झाल्याने अक्षयची प्राणज्योत मालवली होती.

Story img Loader