नागपूर : Agniveer Army Recruitment विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे १० ते १७ जून दरम्यान अग्नीवीर सैन्यभरतीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील ६३५४ उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर पत्रकार परिषदेत दिली. अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली. त्याचा निकाल २० मे रोजी जाहीर करण्यात आला.
या परीक्षेमध्ये उत्तीर्ण ६३५४ उमेदवारांनाच या मेळाव्यात प्रवेश देण्यात येणार आहे. आपले सरकार केंद्राच्या मदतीने येणा-या उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करयात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी या मेळाव्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते.