नागपूर : लष्कराने नागपूर आणि विदर्भातील तरुणांसाठी ‘अग्नीवीर’ भरतीसाठी अर्ज मागवले आहे. भरती प्रक्रियेत बदलासह ही भरती होण्याची शक्यता आहे. त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकींसदर्भात ॲड. प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले; म्हणाले, “सध्या माझ्या…”
लष्कराने अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन नोंदणी १७ मार्च २०२३ पर्यंत करता येणार आहे. बुलढाणा वगळता सर्व जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया ५ ते ११ जुलैला नागपुरात होणार आहे.दरम्यान, आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक चाचणी त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे. मात्र, आता ‘ऑनलाइन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल. बदललेल्या पद्धतीनुसार आकलनसंबंधित पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.