लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
गोंदिया: आज १९ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे सभापती पदासाठी जितेंद्र रहांगडाले तर उपसभापती पदासाठी भूमेश्वर रहांगडाले तर महाविकास आघाडीतर्फे सभापती पदासाठी ओम पटले तर उपसभापती पदासाठी दुर्गाप्रसाद कोठे मैदानात हाेते.
गुप्त मतदानानंतर सभापतीपदासाठी जितेंद्र रहांगडाले यांना १८ पैकी १० मते व ओमप्रकाश पटले यांना ८ मते तसेच उपसभापतीपदासाठी भूमेश्वर रहांगडाले यांना १० मते तर दुर्गाप्रसाद कोठे यांना ८ मते पडली. विशेष म्हणजे, तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपची सत्ता स्थापन झाली आहे.
First published on: 19-05-2023 at 20:09 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural produce market committees election won by bjp in gondia sar 75 dvr