चंद्रपूर : चंद्रपुरात कृषी तंत्रज्ञान उद्यान उभारण्यात येत आहे. हे शेतकऱ्यांसाठी स्थायी व कायमस्वरुपी केंद्र असेल. पंजाब नॅशनल बँकेशी संलग्न करत अजयपूर येथे दहा एकर जागेवर कृषी केंद्र होत आहे. आतापर्यंत हे उद्यान हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये होते. हे कृषी तंत्रज्ञान उद्यान हे राज्यातील आदर्श केंद्र ठरावे व शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, हा उद्देश हे उद्यान उभारणीमागे आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. धनोजे कुणबी समाज मंदिरद्वारे चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित कृषी महोत्सवात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रसंगी धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सुधीर भोंगळे, माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर, संजय धोटे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी नगरसेवक पप्पू देशमुख, देवानंद वाढई, सुनिता लोढिया, सचिन भोयर, मेळावा प्रमुख श्रीधर मालेकर, धनोजे कुणबी समाजाचे उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, सचिव अतुल देऊळकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विधान सभेचे दिवंगत माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभूर्णे यांना मुनगंटीवार यांनी आदरांजली वाहिली.

हेही वाचा – चंद्रपूर : रानडुक्कराच्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

हेही वाचा – चंद्रपूर : बनावट दारू कारखाना प्रकरणातील आरोपीने घेतले विष

मुनगंटीवार म्हणाले, भविष्यात शेतकऱ्यांना समृद्ध व्हायचे असेल, तर त्यांनी जे विकेल तेच पिकविले पाहिजे. शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिकतेचीही जोड दिली पाहिजे. कृषी प्रदर्शनी केवळ चार दिवसांचा उत्सव बनून राहिला तर त्याना कोणताही अर्थ उरणार नाही. अशा प्रदर्शनी कृषी क्षेत्रातील ज्ञानाचे आदान-प्रदान करणारे मुक्त विद्यापीठ बनावे. अशा प्रदर्शनीतून शेतकऱ्यांच्या जीवनात व्यापक बदल होऊ शकतात. ‘जिथे शेत, तिथे मत्स्य तळे’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. मत्स्य जाळी पूर्वी डीपीडीसीतून दिली जायची. आता त्यासाठी ८०० नव्हे, तर ८ हजार रुपये दिले जातात. बोटींसाठी ३ हजार रुपये मिळायचे, आता २५ ते ३० हजार रुपये दिले जातात. यातून शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळाल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.