वर्धा : बियाण्याचा काळा बाजार तसेच बनावट बियाणे विक्री या कैचीत शेतकरी सापडत असल्याचे दर खरीप हंगामातील चित्र असते. या प्रकाराने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाकडून अपेक्षा ठेवल्या जाते. अशी अपेक्षा मार्गी लागावी म्हणून हंगामात काही आदेश निघतात.आता  कृषी सहाय्यक याच्या निगराणीत  मोठी मागणी असलेल्या बियाण्याची विक्री करण्याचे निर्देश कृषी संचालकांनी दिले आहे. प्रामुख्याने काळा बाजार किंवा चढ्या दराने विक्री होत असलेल्या वाणांची यादीच जाहीर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अकोल्यातील ‘त्या’ छापा पथकातील खासगी व्यक्तींवर गुन्हे दाखल करा; डेपो संघटना आक्रमक

रासी ६५९,तुलसी सिड्सचे कबड्डी १४४, नाथ बायोजिंसचे संकेत, न्यूझिविडू चे  आशा व राजा, एशियनचे गोल्ड कॉट, क्रिस्टलचे सरपास, सिडवर्कसचे ७०६७, महिकोचे ७५१, अंकुरचे किर्ती,हरीश व अंकुर ३०२८, कावेरीचे जादू या वाणांच्या विक्रीवर नजर ठेवण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. ज्यादा दराने विक्री झाल्याची ओरड असणाऱ्या दुकानातून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे तपासावी. दराची माहिती घेवून ज्यादा दराने विक्री झाली असल्यास संबंधित दुकानदारावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आहेत.तसेच चढ्या भावाने विक्री करणाऱ्या वितरका विरुद्ध कारवाई न करणाऱ्या कंपनी विरोधात पण कारवाई करण्याचे निर्देश कृषी संचालकांनी दिले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture director directed to sell the seeds which are demand under the supervision of agricultural assistant pmd 64 zws
Show comments