टेस्ट ट्युब बेबीच्या धर्तीवर गायींपासून टेस्टट्युब गोऱ्ही, घरोघरी बायोगॅस, महामार्गालगत शेतकऱ्यांसाठी कालवे, वर्षभर पुरेल इतका चारा एक एकर शेतीत उगवणारे बिज आणि बरेच काही भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात शेतकरी मेळाव्यात बोलताना शेतकऱ्यांना त्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग दाखवला.
जिल्ह्यातील सावनेरमध्ये शंकरपट बक्षीस वितरण व शेतकरी मेळावा झाला. त्यात गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी ते राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. नागपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात टेस्ट ट्युब यंत्रणा विकसीत करण्यात आली असून त्यात टेस्टट्युब बेबी प्रमाणेच गायीपासून टेस्टट्युब गोऱ्हे निर्माण केले जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> नागपूर : मुन्ना यादवच्या मुलांचा गडकरींच्या खासदार क्रीडा महोत्सवात हैदोस
जास्तीत जास्त दुध देणाऱ्या गायींची निर्मिती व्हावी यासाठी हा प्रयोग महत्वाचा असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन केले. शेतकऱ्यांना पशुखाद्याची चिंता राहू नये म्हणून थायलंडमधून आणलेल्या गवताची नवीन प्रजातीपासून एका एकरात वर्षभर पुरेल इतके गवत उपलब्ध होते त्याची लागवड करण्याचे त्यांनी आवाहन केले.. शेतकऱ्यांच्या घराघरात बायोगॅस सुरू व्हावा, त्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून महामार्गालगत सरकारी खर्चाने कालवे खोदून दिले जाणार आहे त्याचा फायदा घ्यावा,असे ते म्हणाले.