‘सत्ता गेल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महाराष्ट्र तुटत असल्याचे दिसत आहे’, असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला. केंद्राच्या माध्यमातून भाजपावाले महाराष्ट्र तोडत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला होता. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
सत्तार हे गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोंदिया जवळील लहरीबाबा आश्रम कामठा येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा- महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”!
धान उत्पादक शेतक-यांना धानाला प्रति क्विंटल बोनस आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सध्या दोन कमिटी काम करीत आहे. एक दिवस बळीराजा ही योजना राज्यभर राबवली जात असल्याने शेतक-यांच्या ख-या समस्या जाणून त्यावर निर्णय घेतले जात आहे. यातून येणा-या काळात शेतकरी आत्महत्या थांबतील, असेही सत्तार म्हणाले.
हेही वाचा- हे काय? पडळकर, खोत आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करणार! आमरण उपोषणाची मागितली परवानगी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राउत यांना, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून धमक्या येत असल्याबाबत त्यांना विचारले असता महाराष्ट्र अशा धमक्यांना भीक घालत नसून मराठी माणसाच्या संरक्षणासाठी जो पुढे येईल, त्याच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील. संजय राऊत यांनी महाराष्ट्राबद्दलचे प्रेम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिकवू नये, असेही ते म्हणाले.