Aheri Assembly Constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत, त्यापैकीच एक म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे राजकीय दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे युती असो की आघाडी, या दोघांनीही अहेरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. मात्र, आत्राम यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणंदेखील पूर्णपणे बदलली आहेत. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

अहेरी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास?

अहेरी विधानसभा मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणता येणार नाही. मात्र, या मतदारसंघात नेहमीच काँग्रेस आणि अपक्ष आमदारांचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात अहेरी, भामरागड, इटापल्ली, मुलचेरा आणि सिरोंचा या गावांचा समावेश होतो. या मतदारसंघाची निर्मिती १९५२ साली करण्यात आली होती. काँग्रेसचे नामदेवराव पोरेड्डीवार या मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यानंतर १९५७ आणि १९६२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजे विश्वेश्वरराव यांचा, तर १९६७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अपक्ष उमेदवार जे. वाय. साखरे यांचा विजय झाला.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न

१९७२ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला. मुकूंदराव अलोने आमदार झाले. मात्र, १९७८ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा अपक्ष, १९८० मध्ये पुन्हा काँग्रेस, १९८५ पुन्हा अपक्ष, १९९० मध्ये पुन्हा काँग्रेस यांच्या ताब्यात गेला. १९९५ मध्ये नागविदर्भ आंदोलन समितीचे सत्यवानराव आत्राम हे या मतदारसंघाचे आमदार झाले. १९९९ साली गोंडवाना गणतंत्र पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम निवडून आले. पुढे याच धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००४ साली ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २००९ साली हा मतदारसंघ अपक्षांच्या ताब्यात गेला. मात्र, २०१४ साली ऐतिहासिक कामगिरी करत भाजपाने पहिल्यांदा या मतदारसंघावर विजय मिळवला. अंबरिशराव आत्राम हे आमदार झाले, पण २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा आत्राम यांनी पुन्हा विजय मिळवला.

हेही वाचा- अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदावारांचे राजकीय गणित? चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत ‘उदंड जाहले अपक्ष’

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला होता. अंबरिशराव आत्राम हे आमदार झाले होते, त्यांना एकूण ५६ हजार ४१८ मते मिळाली होती; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम हे दुसऱ्या स्थानावर राहिले, त्यांना ३६ हजार ५६० मते मिळाली होती. या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या अपक्ष उमेदवार दीपकदादा आत्राम यांना ३३ हजार ५५५, तर चौथ्या स्थानावर राहिलेल्या नोटा या पर्यायाला सात हजार ३४९ मते मिळाली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम विजयी झाले. त्यांना एकूण ६० हजार १३ मते मिळाली होती, तर भाजपाचे अंबरिशराव आत्राम यांना ४४ हजार ५५५ मते मिळाली होती. या निवडणुकीतही दीपकदादा आत्राम यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना ४३ हजार २२ मते, तर नोटाला पाच हजार ७६५ मते मिळाली होती.

या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांनी अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने त्यांना पुन्हा एकदा अहेरीतून रिंगणात उतरवलं आहे.

हेही वाचा – भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार ) धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अहेरी विधानसभा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केलं. त्यात मनसेचे संदीप कोरेत, काँग्रेसचे बंडखोर हनुमंतू मडावी, तर बहुजन समाज पार्टीच्या रमेश गावडे यांचा समावेश आहे. राजकीय दृष्टिकोनातून अहेरी विधानसभेचे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे.

Story img Loader