बुलढाणा : राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली होती. त्यांचे प्रयत्न व पाठपुरावा यशस्वी ठरला असून लवकरच या यादीत या तिघांची नावे समाविष्ट होणार असल्याची माहिती आहे.

स्वराज्य जननी जिजामाता यांनी छत्रपती शिवराय व संभाजी महाराजांना घडवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देखील स्वराज्याच्या विस्तारात मोठा हातभार लावत अनेक वर्षे एक आदर्श राज्य सांभाळले. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या परक्रमाच्या जोरावर अल्पकाळातच मराठा साम्राज्याचा विस्तार, संरक्षण केले व बलाढ्य शत्रूंशी मुकाबला करीत प्राणाचे बलिदान दिले. मात्र, या महामानवांची नावे राष्ट्रपुरुष यादीत नव्हती. हा अधिकार राज्याला नसल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष देऊन ही मागणी केंद्र सरकारकडे रेटली व सतत पाठपुरावा केला. या प्रयत्नाला यश मिळाले असून ही यादी १८ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाचे उपसचिव जे.जे. वळवी यांच्या स्वाक्षरीने केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. लवकरच ही नावे राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या यादीत समावेश केली जाणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar Statement About Jayant Patil
Sharad Pawar : जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानानंतर शरद पवारांचं सूचक विधान
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Collector Jalaj Sharma believes that government schemes help women for advancement nashik
शासकीय योजनांची महिलांना उन्नतीसाठी मदत; मेळाव्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा विश्वास
PM Narendra Modi
PM Narendra Modi : “विकासकामे थांबवणाऱ्यांना सत्तेपासून लांब ठेवा”, पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
Offensive remarks against Chhagan Bhujbal,
भुजबळांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, संशयितास पोलीस कोठडी
Tembhu Yojana sixth phase BJP and Ajit Pawar group members ignored farmers meeting organized by Shiv Sena Shinde group
मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीची पाठ
chhatrapati sambhajiraje swaraj sanghatna
संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!