नागपूर : हल्ली रोजगारासाठी सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. एक जागा निघाल्यास शेकडोच्या संख्येने तरुण नोकरीसाठी अर्ज करतात. दरम्यान नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. त्यामुळे या जागांवर नोकरीची तरुणांना सुवर्णसंधी आहे.तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ परिचारिका अशी पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://aiimsnagpur.edu.in/ या संकेतस्थळावरून भरता येणार आहेत. या भरतीद्वारे (एम्स नागपूर भरती २०२५) १३ रिक्त जागा भरणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२५ आहे. ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती २०२५’ द्वारे पात्र उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना २० ते ५० हजार वेतन दिले जाणार आहे.

बदलीचा मन:स्ताप नाही

नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतर्फे (एम्स) काढण्यात आलेल्या पदभरतीत विविध प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना नागपुरातील एम्समध्येच नोकरीची संधी राहणार आहे. या उमेदवारांच्या बदलीची शक्यता नाही. त्यामुळे या उमेदवारांना नागपुरातून बाहेर जाण्याचा त्रास राहणार नाही.

शैक्षणिक पात्रता काय ?

तांत्रिक अधिकारी पदासाठी सार्वजनिक आरोग्य / महामारीविज्ञान / सांख्यिकी / पर्यावरण विज्ञान या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी शिक्षक आवश्यक आहे. सोबत या उमेदवाराला अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. कनिष्ठ परिचारिका पदासाठी शिक्षण १२ वी पास किंवा समतूल्य शिक्षण मागण्यात आले आहे. एएनएम किंवा जीएनएम, बी. एस. सी. नर्सिंग, ५ वर्षे अनुभव आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी बॅचलर ऑफ सोशल वर्क / सार्वजनिक आरोग्य हे शिक्षण मागण्यात आले आहे. या उमेदवाराला कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

उमेदवाराचे वय किती असावे?

पदभरतीत तांत्रिक अधिकारी पदासाठी कमाल वय मर्यादा ४० वर्षे, कनिष्ठ परिचारिका पदासाठी वय मर्यादा कमाल ३० वर्षे तर सामाजिक कार्यकर्ता पदासाठी कमाल वय मर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

वेतन किती असणार?

तांत्रिक अधिकारी पदासाठी ५० हजार दरमहा, कनिष्ठ परिचारिका पदासाठी २१ हजार रुपये दरमहा, कनिष्ठ परिचारिका पदासाठी २१ हजार दरमहा, सामाजिक कार्यकर्ता पदासाठी २० हजार रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे.

Story img Loader