नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर यकृताशी संबंधित आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची परिस्थिती अत्यवस्थ असल्याने त्यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात येणार होते. मात्र एअर ॲम्बुलन्सची सेवा पुरवणाऱ्या दोन खाजगी कंपन्यांनी त्यांच्याकडे पैसे भरूनही ऐनवेळ नकार कळवला. त्यामुळे चौधरींना मुंबईला हलवता आले नाही.

अत्यवस्थ रुग्णाला तातडीने इतरत्र उपचारासाठी हलविण्यासाठी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था असते. मात्र, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात २४ तासांपेक्षा अधिक काळ प्रयत्न केल्यानंतरही एअर अॅम्बुलन्स मिळत नसेल तर त्याला काय म्हणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे ही वाचा…नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…

काय आहे संपूर्ण प्रकरण

डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी रात्री प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबई येथे नेण्याचा निर्णय निकटवर्तीयांनी घेतला. त्यानुसार, ‘एअर अॅम्बुलन्स इंडिया’ या कंपनीशी संपर्क साधून एअर अॅम्बुलन्सची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी सात लाख रुपयांचा भरणाही कंपनीकडे करण्यात आला. कंपनीने शनिवारी सकाळी ८.३० वाजता एअर अॅम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, एअर अॅम्बुलन्सच्या वेळेमध्ये कंपनीने वारंवार बदल केले. दुपारी १.३० वाजता संबंधितांनी कंपनीशी संपर्क साधला असता एअर अॅम्बुलन्समध्ये बिघाड झाल्याने भोपाळला इमर्जन्सी लेण्डिंग लागल्याचे सांगण्यात आले असे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या एका खाजगी कंपनीशी संपर्क साधून त्यांच्याही कंपनीमध्ये पैसे भरण्यात आले. मात्र त्यांनीही वेळेत एअर ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यास नकार दिला. एअर अॅम्बुलन्स उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने पैसे परत करत असल्याचे कंपनीने शनिवारी दुपारी स्पष्ट केले.

हे ही वाचा…Ladki Bahin Yojana : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिली माहिती

खासगी कंपनीने सांगितले १७ ते २० लाख रुपये

नियोजित एअर अॅम्बुलन्स मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, विद्यापीठ शिक्षण मंचाचे महामंत्री डॉ. सतीश चाफले आणि इतरांनी पुन्हा एकदा एअर अॅम्बुलन्स मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली. नागपुरातील राजकीय संपर्कही त्यासाठी नागपुरातील राजकीय सम्मान, विविध कंपन्यानात रुग्णाला मुंबईला नेण्यासाठी १७ ते २० लाख रूपयांचे शुल्क सांगितले. चौधरी यांच्या निकटवर्तीयांनी त्यासाठीसुद्धा तयारी दर्शविली. परंतु, शनिवारी रात्रीपर्यंत एअर अॅम्बुलन्स मिळू शकली नाही. त्यामुळे डॉ. चौधरी यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली खासगी दवाखान्यातच उपचार सुरू आहेत.