स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय हवाई दलातर्फे नागपुरात १९ नोव्हेंबरला एअर शो आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने नागपूरकरांना विमानाच्या हवाई कसरती बघण्याची संधी मिळणार आहे.पहिले सीडीएस बिपीन रावत यांचा डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्य झाल्याने मागील वर्षी एअर शो रद्द करण्यात आला होता. यावर्षी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. मेंटनन्स कमांडच्या, वायुसेनानगरातील मुख्यालय परिसरात हा शो होत आहे.
हेही वाचा >>>अमरावतीत बच्चू कडूंचे शक्तीप्रदर्शन; म्हणाले, “विनाकारण तोंड माराल, तर…”
यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश राहणार आहे. तसेच इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँड ग्लाइडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँड सादरीकरण बघवायस मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी दिली.