नागपूर : दिवाळीपूर्वी ३० ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी भेट झाल्यास याबाबतची माहिती देऊ शकतो, अशा आशयाचा ई-मेल एका तरुणाने केला असून नागपूर पोलिसांना त्याची ओळख पटली आहे. यापूर्वी एका प्रकरणात अटक झालेल्या एकाचे विमानांना मिळत असलेल्या धमक्यांशी धागेदोरे असण्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचा तपास सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे राहणाऱ्या जगदीश उईके (३५) याला २०११ मध्ये दहशतवादावरील लेखाच्या प्रकरणात अटक करण्यात झाली होती. २१ ऑक्टोबर रोजी त्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहसचिव यांच्यासह सात-आठ राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना एक ईमेल पाठविला. ‘‘२५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान काही कुख्यात दहशतवादी ३० ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार आहेत. त्याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे. फडणवीसांशी भेट घातल्यास ही माहिती देऊ शकतो,’’ असे या जगदीशने लिहिले आहे. ‘जैश ए मोहम्मद’ हे बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा दावा करण्यात आला असून विविध विमान कंपन्यांच्या ३१ विमानांचे अपहरण केले जाणार असल्याचेही यात म्हटले आहे. ‘२५-एमबीए-५-एमटीआर-१०’ हा टूलकिटचा सिक्रेट कोड आपल्याकडे आहे. त्यानुसार पाच बाजार, पाच बस टँड, सहा विमानतळे, पाच मंदिर, पाच रेल्वे स्थानके उडविण्याचा कट असल्याचे जगदीशने लिहिले आहे.
हेही वाचा : Video: ‘लाडकी बहिण’ची थट्टा आमदार रणजीत कांबळेंना भोवणार?
u
आंदोलनाचा इशारा
२८ ऑक्टोबरला फडणवीसांची भेट झाली नाही, तर पाच सहकाऱ्यांसह त्यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा जगदीश उईकेने ईमेलमध्ये दिला आहे. फडणवीस यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतो. त्यांना संपूर्ण माहिती देतो, असेही त्याने लिहिले असून यामुळे दहशतवादविरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा व शहर पोलीस सतर्क झाले आहेत. सोमवारपासून फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
बॉम्ब धमकीप्रकरणी आणखी एक गुन्हा
मुंबई : इंडिगो, एअर इंडिया व विस्तारा या तीन विमान कंपन्यांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर धमकीचा संदेश पाठवल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात सोमवारी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे मुंबईत आतापर्यंत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी धमकीचे संदेश मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तुमचा गळा कापण्याची इच्छा असल्याच्या संदेशासह बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. ‘मांडायमसक्रे’ या ‘एक्स’ खात्यावरून संदेश पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा : भाजपच्या ‘या’ आमदारच्या संपत्तीत तब्बल १०२ कोटींनी वाढ…
जगदीश उईकेचा शोध सुरू आहे. आरोपीच्या प्रोफाइलवरून आम्ही त्याचा विमान उडवण्याच्या धमकी प्रकरणातील संशयित म्हणूनही तपास करणार आहोत.- डॉ. रवींद्र कुमार सिंघल, पोलीस आयुक्त, नागपूर</strong>