अमरावती : डीएचएफएल घोटाळ्यातील पैसा देशाबाहेर पाठवण्याच्या आणि गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याच्या आरोपावरून मूळ अमरावतीकर असलेला उद्योजक अजय नावंदर याला मुंबईत सीबीआयने अटक केल्यानंतर त्याचे शहरातील समर्थक हादरून गेले आहेत. अजय नावंदरच्या अमरावतीतील संबंधांचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असलेल्या डीएचएफएल प्रकरणात ४८ वर्षीय अजय नावंदर याने घोटाळ्यातील पैसा भारताबाहेर पाठवला. हे पैसे ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला दिले गेले असावेत आणि पुढे हाच पैसा भारताविरोधातील कारवायांमध्ये वापरण्यात आला असावा, असा संशय सीबीआयने व्यक्त केला असून याच प्रकरणात अजय नावंदरची चौकशी सुरू झाली आहे.

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

अजय नावंदर हा १९९० मध्ये मुंबईत पोहचला. त्याने सुरुवातीच्या काळात आमदार निवासात जिल्ह्यातील काही आमदारांच्या खोल्यांमध्ये वास्तव्य केले. कुरियर सेवा हाताळली. नंतर त्याने मुंबईच्या उच्चभ्रू वर्तुळात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याने अनेक प्रभावशाली लोकांसोबत चांगले संबंध निर्माण केले. तिरूमला तिरूपती देवस्थानम मंडळाशीही त्याने संबंध प्रस्थापित केले. त्यामाध्यमातून अनेकांना व्हीआयपी दर्शन घडवून आणले. अजय नावंदर हा सिनेतारे-तारकांच्या आणि सर्वपक्षीय पुढाऱ्यांच्या निकटच्या वर्तुळात वावरू लागला. नावंदरने २००० मध्ये नावंदर कन्स्ट्रक्शन ही बांधकाम कंपनी सुरू केली. त्याने काही वर्षांपूर्वी अमरावतीत अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या ‘स्टेज शो’चेही आयोजन केले होते. नावंदर हा मुंबईत स्थायिक असून त्याचे कुटुंबही मुंबईतच आहे.

२०१२ मध्ये नावंदर याने विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. दिल्लीदरबारी वजन वापरून पाहिले. पण, त्याला उमेदवारी मिळू शकली नाही. अखेरीस नावंदरने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यावेळी त्याने अनेक मतदारांना ‘लक्ष्मी दर्शन’ घडवल्याची चर्चा होती. अजय नावंदरला १०५ मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख हे अवघ्या ४० मतांनी पराभूत झाले होते. काँग्रेसचा उमेदवार सहजपणे निवडून येईल, एवढी मतसंख्या पक्षाकडे असूनही बबलू देशमुख पराभूत झाले होते. अनेक नगरसेवकांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन नावंदरला मतदान केल्याचे सांगण्यात आले.

अजय नावंदर हा कोट्यधीश असून २०१२ मध्ये त्याने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्या नावे १ कोटी ७८ लाख रुपयांची, त्याच्या पत्नीच्या नावे ४३ लाख रुपये इतकी मालमत्ता तसेच दोघांकडे सव्वा किलो वजनाचे सोने, हिरेजडित दागिने होते, अशी नोंद आहे.

कुरियरचे काम करणारी एक व्यक्ती तीन दशकांमध्ये कोट्यधीश होते. सर्वपक्षीय बड्या नेत्यांसोबत संबंध प्रस्थापित करते, याचे अप्रूप अमरावतीकरांना होते. अजय नावंदर हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होता. आता तो अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याची माहिती समोर येताच, शहरातील त्याच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. तो दाऊद इब्राहिमचा सहकारी छोटा शकीलचा हस्तक असल्याचे सांगितले जात असून सीबीआयने त्याला अटक केल्यानंतर त्याच्या कृत्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Story img Loader